Share

‘तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू’ ईडीच्या कारवाईनंतर ठाकरेंचा थेट इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांची यादी अर्थमंत्रालयाकडे सोपवणार आहे असा धमकी वजा इशाराच दिला आहे.

‘ईडी उत्खनन करत मोहेंजोदारो आणि हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मला, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा महाविकास आघाडीतील आणखी प्रमुख नेत्यांना ईडीची नोटीस आली, तर धक्का बसणार नाही’ असं राऊत म्हणाले. तर, ‘माझ्याकडेही काही नावं आहेत. सध्या यांची सुरू असलेली सर्व कारवाई पूर्ण झाल्यावर मी सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी अर्थमंत्रालयाकडे सोपवणार आहे. त्यानंतर ईडी कोणाकोणावर कारवाई करते ते आपण पाहूच,’ असं सूचक विधान त्यांनी केलं होतं.

यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीदिनी ‘सामना’ला मुलाखत दिली. सरकारने एक वर्ष पूर्ण केले. सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत! असा दणकाच त्यांनी सुरुवातीला दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखतीत सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली.

विरोधक सरकारवर करीत असलेल्या आरोपांचा कडक समाचार घेतला. ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱयांनो, तुम्हालाही कुटुंब, मुलंबाळं आहेत हे विसरू नका; पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. एक संस्पृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्पृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱयांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो.

तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!