मुंबई : ‘सामना’तील अग्रलेखात भाजप आमदार राम कदम, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांना नाव न घेता टोले लगावण्यात आले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. मात्र, सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरु करुन भाजपमधील ‘उपऱ्यां’नी विजयोत्सव सुरु केला.
मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दारी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वैगैरे लावत पोहोचले. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
देशामध्ये आजही कोरोना अस्तित्वात आहे. राज्यातही बऱ्याच ठिकाणी अनेक रुग्ण आहेत. हे रुग्ण कमी कसे करायचे, यासाठी आमचे सरकार सतत प्रयत्न करीत होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट हळूहळू उघडायची आणि कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू द्यायची नाही, असा आमचा प्रयत्न आहे.
राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर त्यावरून श्रेय घेण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. भाजपने काही ठिकाणी आज आनंदोत्सव साजरा केला. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतय. तसेच मंदिर उघडण्याचे श्रेय भाजपला जाऊच शकत नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील’
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आज नारळांची खास आरास !
- राज्यातील मंदिरे बंद असतानाही ‘या’ देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मिळाला बोनस!
- ‘हेच मंत्री स्वत:च्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारकडून मागतील’ : नारायण राणे
- ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ वादात अडकलेल्या मालिकेवर तोडगा, मुंबईत झाली सकारात्मक बैठक!

