Share

राज्यातील मंदिरे बंद असतानाही ‘या’ देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मिळाला बोनस!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोना संसर्गामुळे मार्च पासून राज्यातील मंदिरे बंद होती. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु दिवाळीच्या पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यात आली आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक मोठ्या देवस्थांनाना कर्मचारी कपात, पगार कपातीसारखे निर्णय घ्यावे लागले. मात्र, पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने कोणतीही कपात केली नव्हती. उलट देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना आता दिवाळी बोनसही देण्यात आला आहे.

मंदीर बंद असलेल्या काळात कर्मचाऱ्यांना कामावर येता आले नाही. शिवाय भाविक नसल्याने दानपेटीत भर पडली नाही. त्यामुळे उत्पन्न मिळाले नाही. तरीही आठ महिने घरात बसून असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा पगार देण्यात आला. त्यांना दिवाळीचा बोनसही देण्यात आला. ग्रामीण भागातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्याच्या संख्येत घट किंवा कर्मचा-यांच्या पगारात कपात केली नाही.

यावर्षीची यात्राही होऊ शकली नाही. मात्र, या काळात भाविकांना प्रसाद पोहचविण्याची व्यवस्था देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनील सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके या कार्यरत विश्वस्तांच्या पुढाकारातून कर्मचारी आणि भाविकांच्या हिताचे निर्णय लॉकडाउनच्या काळात घेण्यात आले.

कोरोना काळात पाथर्डीमधील शासकीय रूग्णालय, आरोग्यमाता केंद्र, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, सेतू कार्यालय यासह रस्त्यामध्ये आढळणारे गोरगरीब भुकेलेले अशा सर्वांनाच अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. अचडणीच्या काळात भक्तांच्या मदतीला धावून येण्याचे कामच देवस्थान ट्रस्टने केले. या सेवा कार्यात कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. याची दखल घेऊन देवस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!