Share

‘हेच मंत्री स्वत:च्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारकडून मागतील’ : नारायण राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अतिवृष्टीची झळ सोसणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये केली. तसेच केंद्र सरकार राज्याशी दुजाभाव करत असल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केला.

यानंतर, भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. याच मुद्द्यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर उपरोधिक टीका केली आहे. “राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागतोय आणि मदत मिळाली नाही तर टीका करत आहे. थोडक्यात या सरकारची अवस्था ‘नाचता येईना आंगण वाकडे’ अशी झालीये. आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्चही केंद्राने द्यावा, अशी मागणी करतील”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

स्वत:च्या ताकदीवर सत्ता चालवता येत नसेल तर जोडतोड करून सरकार आणलंच कशाला? : चंद्रकांत पाटील

दरम्यान, जनतेच्या मदतीची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवलं जात अशी टीका भाजप नेत्यांनी देखील केली आहे. ‘हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या मंत्र्यांमध्येही ताळमेळ नाही. या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या घोषणाही हवेतच विरल्या आहेत, असं सांगतानाच प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवलं जातं.’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘कोरोना काळात केंद्र सरकारने औषधांपासून ते धान्यांपर्यंत सर्व काही राज्याला दिलं. या सरकारने काय केलं? स्वत:च्या ताकदीवर तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर अकृत्रिमपणे जोडतोड करून सरकार आणलंच कशाला? तुम्हाला सरकार चालवता येत नाही का?,’ असा थेट सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!