🕒 1 min read
पुणे : राज्यासह देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्चमध्ये कोरोनाला अटकाव घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणांसह ऐतिहासिक वास्तू, दैनंदिन व्यवहार देखील याकाळात बंद करण्यात आले होते. कोरोनावर औषध नसल्याने सुरुवातीला लॉकडाऊनचा पर्याय वापरण्यात आला.
यानंतर, जूनपासून अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. आता,जवळजवळ जनजीवन पूर्वपदावर आलं असून कोरोना देखील नियंत्रणात आला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी बंद करण्यात आलेले गड-किल्ले देखील सुरु करण्यात आले असून नुकतेच मंदिरं देखील भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत.
मात्र, पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेला व ऐतिहासिक महत्व लाभलेला शनिवार वाडा अद्याप ही पुरातत्व विभागाने सुरु करण्यासाठी काही पावले उचललेली नाहीत. त्यामुळेच पर्यटकांसाठी आकर्षण असलेला हा वाडा येत्या दोन दिवसांत खुला करण्यात यावा अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. पुरातत्व विभागाला वेगळ्या आदेशांची गरज लागते का? असा सवाल विचारत वाडा खुला करण्यासाठी निवेदन देऊन दोन दिवसांची मुदत देखील संघटनेने दिली आहे.
येत्या दोन दिवसात शनिवार वाडा खुला करण्यात आला नाही तर संघटनेतर्फे आंदोलन करून हा वाडा सुरु करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण महासंघातर्फे आनंद दवे यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे डिसेंबर वा जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाचवण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे – राम कदम
- ‘करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले, वाढीव वीजबिल हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा’
- भारताने पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्याच्या आकांक्षा ठेवली पाहिजे- उपराष्ट्रपती
- ‘बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा’
- सरकार नाकर्तेपणा लपवण्यासाठी लोकशाहीवर गदा आणण्याचे काम करत आहे – भाजप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
