Share

स्वत:च्या ताकदीवर सत्ता चालवता येत नसेल तर जोडतोड करून सरकार आणलंच कशाला? : पाटील

Published On: 

मुंबई : २०१९ विधानसभा निकालानंतर शिवसेनेने भाजपशी असलेली युती तोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. सर्वाधिक जागा येऊन देखील भाजपला ऐनवेळी सत्तेचं गणित पलटल्यामुळे विरोधी बाकावर बसावं लागलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर गेल्या वर्षभरात घणाघाती टीका भाजपने केल्याचं दिसून आलं.

आता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या कारभारावरून पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. ‘हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या मंत्र्यांमध्येही ताळमेळ नाही. या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या घोषणाही हवेतच विरल्या आहेत, असं सांगतानाच प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवलं जातं.’ अशी टीका पाटील यांनी केली आहे.

यासोबतच, ‘कोरोना काळात केंद्र सरकारने औषधांपासून ते धान्यांपर्यंत सर्व काही राज्याला दिलं. या सरकारने काय केलं? स्वत:च्या ताकदीवर तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर अकृत्रिमपणे जोडतोड करून सरकार आणलंच कशाला? तुम्हाला सरकार चालवता येत नाही का?,’ असा थेट सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!