Share

‘औरंगझेबाच्या झिझिया कराप्रमाणे ठाकरे सरकार कडून विजबिलांची वसुली’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- राज्यातील ठाकरे सरकारने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करण्याच्या किंवा कमी करण्याच्या संदर्भात जनतेच्या तोंडाला पाने पुसली असून या काळातील अव्वा ते सव्वा बिलांच्या पठाणी वसुलीला महावितरणने सुरुवात केली आहे. दिवाळी संपताच बिल वसुलीचा पठाणी ससेमिरा लावल्याने लोक त्रस्त झाले आहेत. औरंगजेबाने झिझिया कराची वसुली केली त्याची पुनरावृत्ती ठाकरे सरकार करते आहे, या कृतीचा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची घोर फसवणूक केली आहे. वापर नसतानाही हजारो रुपयांची बिले जनतेला पाठवण्यात आली. या विषयी भाजपाने राज्यभर तीव्र आंदोलन छेडले असता वाढीव विजबिलांबाबत फेरविचार करू असे आश्वासन ठाकरे सरकारने दिले होते. कोरोनाच्या काळात लोकांचे व्यवसाय, कामधंदे ठप्प असताना आणि बहुतांश लोक आर्थिक संकटात असताना ठाकरे सरकारने एकही दमडी कमी न करण्याची निर्लज्ज घोषणा केली. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले ठाकरे सरकार वारंवार केंद्र सरकार कडे बोट दाखवून आपल्या अपयशाचे खापर केंद्रावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. राज्यातील सर्वच प्रश्न केंद्राने व पंतप्रधानांनी सोडवायचे असतील तर मग ठाकरे सरकार फक्त खुर्च्या उबवण्यासाठी उरले आहे का ? आम्हाला राज्य चालवता येत नाही, हे एकदा जाहीर करून टाका. जनतेचे प्रश्न सोडवण्याची धमक नसेल तर राज्य सरकार तुम्ही स्वतःच विसर्जित करा, असे आव्हान शिवराय कुळकर्णी यांनी दिले आहे.

लॉकडाऊन च्या काळात ज्यांचे कारखाने, दुकाने व घर बंद होते त्यांनाही हजारो रुपयांचे बिल आले आहे. अंदाजे बिल पाठवण्याच्या नावाखाली जनतेच्या खिशावर डाका घालण्याचे दुष्कृत्य महावितरणने केले आहे. नितीन राऊत हे ऊर्जामंत्री नसून ग्रीडफेल मंत्री आहेत. ऊर्जा खात्याची वाट लावणारे मंत्री म्हणून नितीन राऊत यांच्या नावाची इतिहासात नोंद होईल असं देखील कुळकर्णी म्हणाले.

एकीकडे ऊर्जामंत्री म्हणतात की टप्प्या टप्प्याने वीज बिल वसूल करा आणि प्रत्यक्षात दिवाळी संपताच महावितरणने ग्राहकांना धमकावणे सुरू केले आहे. घरोघरी माणसं पाठवून आणि फोन करून चोवीस तासात बिल भरा नाही तर तुमची वीज कापू अशा धमक्या महावितरणकडून दिल्या जात आहेत. औरंगझेबाच्या काळात ज्या प्रकारे झिझिया कराची वसुली केली जात होती त्याची पुनरावृत्ती उद्धव ठाकरे सरकारने सुरू केली असल्याची टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!