Share

‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला; मध्यप्रदेशात येणार कडक कायदा !

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ: लव्ह जिहाद किंवा रोमियो जिहाद हे मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम नसलेल्या मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यातला लावण्याचा प्रकार समजला जातो. प्रेमाचा ढोंगीपणा आहे. भारतामध्ये केरळमध्ये प्रथम आणि नंतर कर्नाटकमध्ये २००९ मध्ये या संकल्पनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हा शब्द भारताच्या संदर्भात वापरला जातो पण ब्रिटनसारख्या देशांमध्येही अशाच प्रकारच्या कृती झाल्या आहेत. केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात लव्ह जिहादचे सत्य सापडले आहे.

या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकार आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, आम्ही विधानसभेत लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहोत. हा एक अजामीनपात्र गुन्हा असेल आणि दोषींना पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असेल. मध्यप्रदेश सरकारच्या या निर्णयावर अभिनेता जिशान अय्युब संतापला आहे. आता धर्म पाहून प्रेम करायचं का? असा सवाल त्याने सरकारला केला आहे.

“प्रेम केल्यावर तुरुंगात जावं लागेल की प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहावा लागेल? घाबरु नका समाजात द्वेष पसरवणाऱ्याना आता कोणी टोकणार नाही. उलट टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं जाईल. लव्ह जिहादसारख्या एका खोट्या संकल्पनेवर कायदा तयार केला जात आहे. वाह सरकार कमाल केलीत तुम्ही.” अशा आशयाचं ट्विट करुन जिशानने आपला राग व्यक्त केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

या अगोदर उत्तर प्रदेश, हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले की, “आगामी विधानसभा सत्रात शिवराजसिंह सरकारकडून लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर धर्म स्वातंत्र्य कायद्यासाठी विधेयक सादर केले जाईल आणि कायदा तयार झाल्यानंतर अजामीनपात्र कलमांतर्गत खटला दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कडक शिक्षा दिली जाईल.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!