🕒 1 min read
मुंबई : हरियाणामध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे देशभरात ‘लव जिहाद’ हा मुद्दा चर्चेत आला आहे. कर्नाटक पाठोपाठ मध्यप्रदेश सरकारने याबाबत मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. यानुसार विधानसभेत लव जिहादबाबत विधेयक आणण्यात येणार आहे. लव जिहादवर ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता जीशान अय्यूबसह अनेक कलाकारांना ही गोष्ट पटलेली नाही.लव्ह जिहाद विरोधात कायद्याच्या पार्श्वभूमीवर त्याने केलेले ट्विट सध्या चर्चेत आहेत. आता धर्म पाहून प्रेम करायचे का? असा सवाल त्याने यानिमित्ताने केला आहे.
प्यार करने पर जेल जाना पड़ेगा!!!
या प्यार करने से पहले धर्म देखना पड़ेगा!!!
घबराइए मत, नफ़रत करने पर कोई नहीं टोकेगा, बल्कि तालियाँ बजाईं और बजवाईं जाएँगी!!????????????????????????
#lovejihaad जैसे झूठ पर क़ानून बनाया जा रहा है! वाह साहेब वाह!!! https://t.co/7IgbrGh5vG— Mohd. Zeeshan Ayyub (@Mdzeeshanayyub) November 17, 2020
प्रेम केल्यास तुरुंगात जावे लागेल किंवा मग प्रेम करण्यापूर्वी धर्म कोणता ते पाहावे लागेल. घाबरू नका, समाजात द्वेष पसरवणा-यांना कोणी टोकणार नाही. उलट त्यांच्यासाठी टाळ्या पडतील. लव्ह जिहादसारख्या तद्दन खोट्या संकल्पनेवर कायदा बनवला जातोय. वाह साहेब वाह, असे ट्विट मोहम्मद जीशान अय्युबने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सुरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पाहायला गेलेल्या आमिरवरच नेटकरी झाले भारी!
- ‘करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले, वाढीव वीजबिल हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा’
- मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने हिंदुत्त्व सोडले त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार?
- महाराष्ट्र सरकार व महावितरण कंपनी कडून सर्व सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा- संभाजी ब्रिगेड
- अनुदानाच्या श्रेयासाठी पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेत रस्सीखेच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
