Share

‘सुरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पाहायला गेलेल्या आमिरवरच नेटकरी झाले भारी! 

Published On: 

मुंबई : लॉकडाउनचा सर्वात मोठा आर्थिक फटका बसल्या नंतर चित्रपटसृष्टी तसेच सिनेमागृह आणि नाट्यगृह पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. मात्र अद्याप देखील प्रेक्षकांकडून तितकासा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट भारतभर मोठ्या पडद्यावर रिलीज झाला असून,  हा सिनेमा पाहण्यासाठी आमीर खान आणि मुलगी इरा सोबत थिएटरमध्ये आला होता. यानंतर त्यानं सोशलवर पोस्टही शेअर केली, परंतु त्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागला.

जेव्हा आमीर खान सिनेमा हॉलमध्ये आला तेव्हा त्याला लोकांनी चहूबाजूंनी घेरलं. यावेळी त्यानं फोटोसाठी आरामात पोजही दिल्या. ट्विट करत त्यानं याबाबत माहिती दिली. आमीरनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, सिनेमा हॉलमध्ये सूरज पे मंगल भारी पाहायला जात आहे. दीर्घकाळानंतर मोठ्या स्क्रीनचा अनुभव घेण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे.आमीरच्या या ट्विटनंतर लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. लोकांचं म्हणणं होतं की, अद्याप कोरोना संपलेला नाही. अशात सिनेमा हॉलमध्ये सिनेमा पाहायला जाणं योग्य असणार नाही. आमीरच्या या ट्विटमुळं काही लोक नाराजही झाले.

दरम्यान, अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नवीन व्हिडिओमध्ये धक्कादायक खुलासा केला होता. इराने सांगितले की, 14 वर्षांची असताना ओळखीच्या लोकांकडून तिचे लैंगिक शोषण झाले होते. 10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या दिवशी इराने डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा केला होता, यानंतर अनेकजण तिला डिप्रेशनचे कारण विचारत होत. याबाबत बोलताना इराने या गोष्टीचा खुलासा केला. या व्हिडीओ नंतर इराची सर्वत्र चर्चा चालू होती.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!