🕒 1 min read
मुंबई : हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी आज जोरदार टीका केली. ‘जे परीक्षेला बसत नाहीत आणि पासही होत नाहीत. त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?,’ असा टोला राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी करून ते मुख्यमंत्रिपदावर बसले आहे. हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीशी घरोबा केला. मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नसून केवळ पिंजऱ्यात बसून राहतात. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने हिंदुत्त्व सोडले. त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार, अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
पालघरमधील साधुंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम यांच्याकडून खार ते गडचिंचले असा ‘जनआक्रोश मोर्चा’ काढणार होते. मात्र, मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर काही वेळातच राम कदम यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम कदम यांची भेट घेतली. शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.
राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असे म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करुन शिवसेना सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विचारसरणीचे नाहीत. पदासाठी हवे ते करणारे उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना म्हणजे हिंदुत्व विचार आणि समीकरण नाही अशी टीका ही नारायण राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सुरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पाहायला गेलेल्या आमिरवरच नेटकरी झाले भारी!
- ‘करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले, वाढीव वीजबिल हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा’
- कौतुक आणि टीकेचं मी स्वागत करते,तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन मी पुन्हा येईन : अमृता फडणवीस
- महाराष्ट्र सरकार व महावितरण कंपनी कडून सर्व सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा- संभाजी ब्रिगेड
- अनुदानाच्या श्रेयासाठी पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेत रस्सीखेच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
