अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- परतीच्या पावसाने अहमदनगरला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले होते. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकाराच्या मिळणाऱ्या चौदा कोटी रुपयाचे अनुदानाचे श्रेय घेण्यावरुन राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्षात व शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. भाजपाच्या एका गटाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना पाहणी दौऱ्यात अडविले आता अनुदानाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपने करु नये, अशी टिका ॲड.प्रताप ढाकणेंनी केली आहे.
पाथर्डी तालुक्यातील शेतक-यांना चौदा कोटी रुपयाच्या अनुदानाची रक्कम मिळाली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी हसन मुश्रीफ यांना शेतक-यांच्या पिकांची नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केली होती.
मुश्रीफ यांनी पाथर्डी व शेवगावचा दौरा केला होता. शेतक-यांची दिवाळी गोड करु असे मुश्रीफ यांनी त्यावेळी सांगितले होते. दरम्यान, शेतकऱ्याना मिळणारे अनुदान शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने मिळाले असल्याची माहीती शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश चितळे यांनी दिली.
सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये व फळपिंकासाठी पंचवीस हजार रुपयाची मदत जाहीर केली. त्याचे अनुदानाचे पैसे आले आहेत. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे व चंद्रशेखर घुले यांनी पत्रक प्रसिद्धीला देवुन ही मदत राज्याचे महाआघाडीचे सरकार करणार असून भारतीय जनता पक्षाने याचे श्रेय लाटु नये, अशी टिका केली.
शिवसेना, राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाच्या कलगीतु-यामधे काँग्रेस पक्ष मात्र शांत असल्याचे दिसते आहे. श्रेय कोणालाही मिळो शेतक-यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम लवकर जमा व्हावी असा आग्रह शेतक-यांनी धरला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाचवण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे – राम कदम
- ‘दोन दिवसांत शनिवार वाडा उघडा अन्यथा…’ ; ब्राह्मण महासंघाचा आक्रमक इशारा
- भारताने पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्याच्या आकांक्षा ठेवली पाहिजे- उपराष्ट्रपती
- ‘बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा’
- सरकार नाकर्तेपणा लपवण्यासाठी लोकशाहीवर गदा आणण्याचे काम करत आहे – भाजप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

