Share

‘करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले, वाढीव वीजबिल हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा’

Published On: 

मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.

राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.

याच मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. वीज बिलं चुकीची आणि वाढीव दिलेली आहेत. त्यामुळे ग्राहकांवर जो अन्याय झाला आहे तो दूर व्हायलाच हवा. त्यासाठी सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती गठीत करण्यात यावी, म्हणजे  दूध का दूध और पानी का पानी होगा असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले असून हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा आहे, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला.

दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव काळात वाढीव व चुकीच्या वीज बिलामध्ये सवलत देऊ असं खोटं बोलणाऱ्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता वीज बिलामध्ये सवलत देता येणार नाही असे स्पष्ट करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे त्यामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आगामी अधिवेशनात विधानसभेमध्ये हक्कभंग आणणार असल्याचे भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!