Share

‘गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट केलं आहे. तसेच सगळ्या भाऊरायांना एक मागणं केलं आहे.

भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात.

अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं स्त्रियांना समर्पित केलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओत अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे.

अमृता फडणवीस यांनी हे गाणं ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करताच त्यांच्या या गाण्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. काही नेटकऱ्यांनी हे गाणं आवडल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनी फडणवीस यांच्या गाण्याची टर उडवली आहे. ‘गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही’, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात…

हिला नको गाऊ द्या…चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?

गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे .आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,?त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी.

पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या आज अमृताचा दीनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा- महेश टिळेकर

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!