🕒 1 min read
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनीही शपथ घेतली असून या दोघांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे.
नितीशकुमार यांचे सरकार स्थापन झाल्यावर आज सकाळी ११.३० वाजता मंत्रमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या विभागांची विभागणी होणार असल्याचे समजते आहे. तसेच राजकीय आणि कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चर्चा होण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.
BJP squeezes it's enemies till they become lifeless. It does the same to its friends. Nitish Kumar is the latest example of this. He will be CM but only in name.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) November 16, 2020
दम्यान माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यशवंत सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल असं म्हटलं आहे.
दरम्यान, संयुक्त जनता दलाचे माजी नेते राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही नितीश कुमार यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.’भाजपा नामनिर्देशित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनिंदन. राज्याला काही वर्षांपर्यंत एका थकलेल्या व राजकीयदृष्ट्या महत्वहीन झालेल्या नेत्याच्या प्रभावहीन सरकारसाठी तयार रहायला हवे.’ असे प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही’
- बाळासाहेबांचे ‘ते’ दुसरे स्वप्नही आम्हीच पूर्ण करू : छगन भुजबळ
- बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांनी ‘अशी’ वाहिली आदरांजली
- कोणतीही लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही ;डब्ल्यूएचओच्या प्रमुखांचा दावा
- बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दावरून मनसे नेत्याने शिवसेनेला डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
