Share

भाजपच्या महिला खासदाराच्या ८ वर्षीय नातीचा फटाक्याने भाजल्याने दुर्दैवी मृत्यू

Published On: 

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या  8 वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. फटाके पेटवताना झालेल्या अपघातात ही मुलगी गंभीर जखमी झाली होती अशी माहिती समोर येत आहे. संपूर्ण प्रकाराने भाजप खासदार रिता बहुगुणा आणि त्यांच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, रीता बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके पेटवत होती. इतर मुलांसोबत तीदेखील घराच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेली होती. दिवाळीला फटाके पेटवताना चिमुरडीनं फॅन्सी ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली.

यावेळी चिमुकली तब्बल ६० टक्क्यांहून अधिक भाजली असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीला मुलीवर प्रयागराजच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक सुरू होते. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला एअर अॅम्बुलेन्सने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच तिने या जगाचा निरोप घेतला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!