Share

‘माझ्या मुलाने भारतात तरी गायक बनू नये…’; सोनू निगमचे वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

मुंबई- गायक सोनू निगम नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. त्याच्या एका वक्तव्यामुळे नेहमी नव्या वादाला तोंड फुटतं. यावेळी सुद्धा त्यांची जीभ सगळ्यांसमोर घसरली. त्यामुळे आता कदाचित नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

सोनू निगमच्या गाण्याचा अल्बम लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या अल्बममधलं ‘ईश्वर का वो सच्चा बंदा’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्यानिमित्त त्याची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी सोनू निगमला प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुझ्या मुलाला गायक होण्याची इच्छा आहे का? त्यावर सोनूने उत्तर दिलं, नाही त्याला गायक होण्याची इच्छा नाही. आणि त्याला गायक व्हावसं वाटलं तरी त्याने भारतामध्ये गायक होऊ नये अशी माझी इच्छा आहे.’

सोनू म्हणाला,’खरे सांगू, त्याने सिंगर बनावे, अशी माझीही इच्छा नाही. कमीत कमी भारतात तरी नाहीच. तसाही तो आता भारतात राहत नाही. तो दुबईत राहतो. त्याला मी आधीच भारताबाहेर पाठवले होते,’ असे सोनू म्हणाला.

‘माझा मुलगा सध्या दुबईमध्ये आहे. तो उत्तम गातो. पण त्यालाही सिंगर व्हायची इच्छा नाही. त्याला गेमिंगमध्ये खूप रस आहे. तो युएईचा टॉप गेमर आहे. एक गेम फोर्टनाइट आहे आणि तो त्याचा टॉप गेमर आहे. तो खूप हुशार आहे. त्यात अनेक चांगले गुण आहेत. मी त्याच्यावर माझे निर्णय लादू इच्छित नाही. त्याची इच्छा काय आहे, ते बघू,’ असेही पुढे तो म्हणाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!