Share

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांनी ‘अशी’ वाहिली आदरांजली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहणार आहेत. तर सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत.

स्मृतीस्थळावर न जाता घरातून, कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मृतीस्थळावर जाऊ नका असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन.., असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मराठी माणसाचं पाऊल पुढे नेण्याचं दुसरं स्वप्नही आम्ही पूर्ण करु, असं वचन राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं.

“बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे स्मृतिस्थळावर आलो आहे. यावर्षी मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न नियती आणि जनतेने पूर्ण केलं आहे. यामुळे यंदा विशेष महत्त्व आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. बाळासाहेबांचं आणखी एक स्वप्न होतं, की महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं पाहिजे, हे आम्ही पूर्ण करु” असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!