Share

एसबीआय कडून घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना गृहकर्जावर मिळणार ‘ही’ खास ऑफर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: घर खरेदी करणे म्हणजे अनेकांच्या स्वप्नांपैकी एक मोठे स्वप्न असते. तर सध्याच्या काळामध्ये कधी कधी नोकरदारांचे संपूर्ण आयुष्यभराची पुंजी गोळा केल्यानंतर घर खरेदी करण्याचा विचार केला जातो. तर गृहकर्ज घेऊन घर खरेदी करणे म्हणजे त्यामध्ये एक मध्य मार्ग ठरतो. त्यासाठी ग्राहकांकडून गृहकर्ज खरेदी केली जाते. यावेळी दिवाळीला तुम्ही जर नवीन घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी विशेष दिवाळी ऑफर आणल्या आहेत. स्टेट बँकेकडून गृहकर्ज दरात 0.25 टक्के सूट दिली जात आहे. तसेच यासाठीचे लागणारे प्रक्रिया शुल्क देखील आकारले जाणार नाही. एसबीआयमध्ये गृहकर्ज घेण्यासाठी सुरवाती वार्षिक व्याजदर 6.90 टक्के आहे. हा व्याज दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर लागू होतो.

अशी आहे एसबीआयची खास ऑफर एसबीआयमध्ये सुरवाती गृहकर्जावर 6.90 टक्के व्याज दर मिळणार – सणासुदीत बँक व्याज दरावर 0.25 टक्के सवलत मिळेल – प्रक्रिया शुल्क 100 टक्के माफ केले जाईल – योनो (YONO) अॅपवरून अर्ज घेतल्यावर खास सवलती मिळणार आहेत. एसबीआयच्या गृह कर्जावर ग्राहकांना 75 लाख रुपयांपर्यंतच्या घर खरेदीसाठी 0.25% व्याज सवलत मिळणार आहे. ही सूट सीआयबीआयएलच्या स्कोअरवर आधारित असेल आणि योनो अॅपद्वारे अर्जावर उपलब्ध असणार अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

नुकतच आयबीएकडून ८.५ लाख सरकारी बँक कर्मचार्यांना १५ टक्के वार्षिक वेतनवाढ जाहीर झाली आहे. तर आता एसबीआय कडून ग्राहकांना देखील गृहकर्जावर जबरदस्त ऑफर देण्यात आल्याने घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. तर कोरोनानंतर एसबीआय ऑफर मुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!