🕒 1 min read
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहणार आहेत. तर सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत.
स्मृतीस्थळावर न जाता घरातून, कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मृतीस्थळावर जाऊ नका असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
स्मारक की मातोश्री तीन?? pic.twitter.com/0KG8bpDk6J
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 17, 2020
गेल्या कित्येक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या मुद्दावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट करून आज पुन्हा एकदा शिवसेनावर हल्लाबोल केला आहे. देशपांडे यांनी महापौर बंगल्याचा फोटो शेअर केला असून ‘स्मारक की मातोश्री 3?’ असा खोचक सवाल थेट सेनेला विचारला आहे.
Tv9 ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जर खरोखर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदिस्त का आहे? ते सर्वसामान्यांसाठी खुलं का नाही? जनता तिथे का जाऊ शकत नाही? कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं ते का वापरलं जातं? असे प्रश्नही संदीप देशपांडेंनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’
- दिलासादायक : कोरोनाची लस 94.5 टक्के यशस्वी असल्याचा अमेरिकन कंपनी मॉर्डनाचा दावा
- बीड जिल्हयातील कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु
- कोणतीही लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही ;डब्ल्यूएचओच्या प्रमुखांचा दावा
- बनावट डिझेल प्रकरण; मुख्य सुत्रधार देशमुखला अखेर अटक, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
