🕒 1 min read
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहणार आहेत. तर सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत.
स्मृतीस्थळावर न जाता घरातून, कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मृतीस्थळावर जाऊ नका असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान,भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन असं त्यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 17, 2020
दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या मुद्दावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट करून आज पुन्हा एकदा शिवसेनावर हल्लाबोल केला आहे. देशपांडे यांनी महापौर बंगल्याचा फोटो शेअर केला असून ‘स्मारक की मातोश्री 3?’ असा खोचक सवाल थेट सेनेला विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’
- दिलासादायक : कोरोनाची लस 94.5 टक्के यशस्वी असल्याचा अमेरिकन कंपनी मॉर्डनाचा दावा
- बीड जिल्हयातील कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु
- कोणतीही लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही ;डब्ल्यूएचओच्या प्रमुखांचा दावा
- बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दावरून मनसे नेत्याने शिवसेनेला डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
