Share

ना न्यालयाची माफी मागणार, ना ‘ते’ ट्विट हटवणार; कुणाल कामरा ठाम!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामीसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. अर्णबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव असता ‘तात्काळ सुनावणी’साठी सूचीबद्ध करून अर्णबच्या जामीनावर तातडीने सुनावणी करण्यात आली.

यानंतर, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अर्णव गोस्वामीच्या सुटके नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. यातच सदर प्रकरणावर स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने देखील खोचक ट्विट केले होते. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचं म्हणत विधि शाखेच्या एका विद्यार्थ्यानं आणि दोन वकिलांनी ऍटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता कामरा यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालणार आहे.

दरम्यान, ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला कुणाल कामरा यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. ‘मी नुकतेच जे ट्विट केलंय त्याने कोर्टाचा अवमान झाल्याचं बोललं जात आहे. प्राईम टाइमच्या लाऊडस्पीकरच्या बाजूने कोर्टाने जो अंतरिम निर्णय दिला आहे. त्यावर मी ट्विट केलं आहे. माझा दृष्टीकोण बदललेला नाही. दुसऱ्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालाचं मौन टीकेच्या स्वातंत्र्याच्या कक्षे बाहेर राहू शकत नाही.’

यासोबतच, ‘माझं ट्विट हटवण्याचा किंवा माफी मागण्याचा माझा इरादा नाही.’ असं कुणाल कामराने सांगितले. तर, अन्य प्रकरणं सोडून माझ्या अवमाननेच्या याचिकेवर कमीत कमी 20 तास सुनावणी व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असं त्याने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!