🕒 1 min read
कोल्हापूर : यंदा राज्यासह देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन पासून सर्वच प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. आता, अनलॉक प्रक्रियेअंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत असून अजूनही मंदिरं व इतर प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारने ठोस घोषणा केलेली नाही.
त्यामुळे, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांच्या मंदिरामध्ये यावर्षीचा नवरात्रोत्सव देखील साधेपणाने पार पडला. याकाळात, सर्व धार्मिक विधि व पूजा मंदिर व्यवस्थापनांनी खंड न पडू देता पूर्ण केल्या. आता, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव पार पडत आहे. वास्तुकलेच अप्रतिम नमुना म्हणून कोल्हापूरातील महालक्ष्मीच्या मंदिराला अनोखं महत्व देखील आहे.
कसा पार पडतो हा किरणोत्सव ?
किरणोत्सव हा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचा अनोखा सोहळा . सूर्यास्तापूर्वी काही क्षण सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी आईच्या चरणावर दुसऱ्या दिवशी छातीवर आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलावर स्पर्श करतात. साधारण दिडशे मीटर हून अधिक अंतर कापून ही किरणे महाद्वार कमानीतून येणारी ही किरणं गरुड मंडप गणेश मंडप मध्य मंडप अंतराल मंडप गर्भागार अशा रस्त्याने देवीच्या भेटीला येतात.
तेव्हा मंदिरातले सर्व विद्युत दिवे बंद केले जातात या सोनेरी किरणांच्या प्रकाशात जगदंबेचं दुर्गा सप्तशती च्या प्राधानिक रहस्यात दिलेलंर तप्तकांचन वर्णभा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची हे वर्णन सार्थ ठरते. या किरणांचा स्पर्श होताच मोठा घंटानाद करून सहावी आरती केली जाते. गेली कित्येक शतके अव्याहत सुरू असलेला सुंदर व अलौकिक उत्सव!
काल गुरुवार दि. १२ नोव्हेंबर 2020 रोजी सुर्य किरणांनी आई जगदंबेला संपूर्ण अभिषेक केला व हळूहळू लुप्त झाली. यासोबतच कालपासून दिवाळीला सुरुवात झाली. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि याचेच औचित्य साधून अंबाबाईच्या नित्यपुजेसोबत गाय व वासरू यांच्या मूर्तीची देखील गाभाऱ्यात पूजा करण्यात आली.
पहा या सोहळ्याचे डोळे दिपवणारे फोटो –



वसुबारसच्या निमित्ताने आई अंबाबाईची मनमोहक पूजा-

महत्वाच्या बातम्या
- बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊत सोमय्यांवर भडकले
- राऊतांनी थातुरमातूर न बोलता सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत – राम कदम
- पार्सल कोल्हापूरवरून आलं काय किंवा सांगलीवरून आलं काय, ते व्हाया पुणेच दिल्लीला जातं– गिरीश बापट
- आमिर खानची फजिती : जायचं होतं फडणवीसांच्या दारी, पोहचले अशोक चव्हाणांच्या घरी !
- शेतकरी विरोधी धोरणे रद्द करावीत; बलिप्रतिपदा दिनी हजारो शेतकरी पंतप्रधानांना पत्र पाठविणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
