Share

अयोध्येतील यंदाची दिवाळी गिनीज बुकात जाणार; साधुसंत, भक्तांमध्ये दीपोत्सवाचा उत्साह

Published On: 

अयोध्या: यावर्षी गेली कित्येक वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिक्षेत असलेला राम मंदिराचा निकाल लागला आणि श्रीरामांच्या भक्तांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर त्यानंतर लॉक डाऊन च्या काळामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्या मध्ये राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल. यावेळी देखील देशभरामध्ये राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा उत्साह दिसून आला. तर आता यावर्षीची अयोध्येतील दिवाळी देखील संस्मरणीय होणार आहे. योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येत सन २०१७ पासून दीपोत्सवाची सुरुवात केल्यानंत आता दीपांच्या संख्येत सुमारे ४ पट वाढ झाली आहे. यामुळे अयोध्येतील यावेळची दिवाळी विशेष असणार आहे.

याचे कारण म्हणजे अयोध्या नगरीला १६ शृंगारांनी सजवले जाणार आहे. या निमित्ताने अयोध्येतील २४ घाट दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघणार आहेत. विशेष म्हणजे, दिवाळीत करोनाचा प्रोटोकॉल लक्षात घेत सर्व नियमांचे पालन करण्यासाठी सर्व प्रकारची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. दीपोस्तवानिमित्त या वेळी अयोध्या ५ लाख ५१ हजारांहून अधिक दिव्यांनी झगमगून जाणार आहे. यामुळे अयोध्या नगरीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१७ पासून अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली होती. तसेच त्यावेळी १ लाख ६५ हजार दीप उजळण्यात आले होते. तसेच सन २०१८ मध्ये ३ लाख १५० दिवे लावण्यात आले . त्यावेळी जागतिक विक्रम झाला होता. यानंतर सन २०१९ मध्ये ५ लाख ५१ हजार दिवे लावून जागतिक विक्रम रचला गेला होता. या वेळी अयोध्येत २४ घाटांवर ६ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. यासाठी २९ हजार लीटर तेलाचा वापर करण्यात येणार आहे. दिव्यांच्या प्रकाशाने अयोध्येला प्रकाशमान करण्यासाठी ७.५ लाख किलो रुईचा देखील वापर होणार आहे.

राममंदिर निर्माण करण्याच्या निर्णयानंतर दीपोत्सवासाठी रामनगरीचे साधुसंत आणि भक्तांमध्ये उत्साह आहे. अयोध्येत त्रेतायुगासारथी दिवाळी साजरी करण्याची परंपरा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सन २०१७ साली सुरू केली होती. तेव्हा पासून दरवर्षी येथे दीप प्रज्वलित करण्याचा विक्रम तयार होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!