🕒 1 min read
बिहार : देशाचं लक्ष्य सद्या बिहारच्या निवडणुकांकडे लागलं आहे. कोरोनाच्या हाहाकारानंतर देशात पहिलीच निवडणूक पार पडत आहे ती बिहारच्या विधानसभांसाठी. बिहारमध्ये आज तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.
तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी मतदान होत असून नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात जोरदार कसोटी रंगत आहे. ही आपली अखेरची निवडणूक असल्याचं नितीश कुमार यांनी जाहीर केल्यानंतर ही निवडणूक आता प्रतिष्टेची बनली आहे.
दरम्यान, आजच्या अंतिम टप्प्यातील मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून बिहारच्या जनतेला मतदानाच नवा विक्रम बनवा असं आवाहन केलं आहे. ‘बिहार विधानसभा निवडणुकीचे आज तिसरे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे कि त्यांनी जास्तीत जास्त संख्येने लोकतंत्राच्या या पावन पर्वात भागीदार बनावं आणि मतदानाचा नवा रेकॉर्ड रचावा. आणि, मास्क घालावा तसेच सोशल डिस्टंसिंगची देखील काळजी घ्यावी’ असं ट्विट करून त्यांनी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली आहे.
बिहार विधानसभा चुनावों में आज तीसरे और आखिरी चरण का मतदान है। सभी मतदाताओं से मेरी विनती है कि वे अधिक से अधिक संख्या में लोकतंत्र के इस पावन पर्व में भागीदार बनें और वोटिंग का नया रिकॉर्ड बनाएं। और हां, मास्क पहनने और सोशल डिस्टेंसिंग का ध्यान भी अवश्य रखें।
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे
- राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषित केलेली मदत पुरेशी नाही; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- कांद्याचे भाव स्थिरच, आता पुन्हा आवक घटली!
- मुख्यमंत्री वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना नेत्यानेच घेतली राज्यपालांची भेट !
- …म्हणून आम्ही शिवसेनेसोबत हातमिळवणी केली – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
