मुंबई : शुक्रवारी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दर्जा असणारे किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुंबईत आलो होतो, पण मुख्यमंत्री भेटले नाहीत, त्यामुळे राज्यपालांकडे जाऊन भेट घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
मागील ४ दिवसांपासून किशोर तिवारी मुंबईत आहेत, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांना भेट झाली नाही अखेर तिवारी यांना राजभवनाचे दार ठोठावले. विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय द्यावा, खुद्द राज्यपालांनी या भागाचा दौरा करावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी निवेदनद्वारे केली.
यासोबतच, ‘राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींची मदत घोषित केली आहे, ती पुरेशी नाही’ अशी तक्रारही किशोर तिवारींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे केली. यावेळी किशोरी तिवारी यांनी सांगितले की, ‘विदर्भ आणि मराठवाडा यांचा अनुशेष दूर करावा अशी मागणी राज्यपालांना केली, अतिवृष्टीमुळे पीडित शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात आलेल्या १० हजार कोटींच्या मदतीत विदर्भाला खूप कमी मदत मिळणार असल्याचं’ राज्यपालांना सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून शिवसेना नेत्यानेच महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर देत नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे
- पाच हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याची फडणवीसांची माहिती खोटी ठरली – सचिन सावंत
- कांद्याचे भाव स्थिरच, आता पुन्हा आवक घटली!
- मुख्यमंत्री वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना नेत्यानेच घेतली राज्यपालांची भेट !
- …म्हणून आम्ही शिवसेनेसोबत हातमिळवणी केली – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

