Share

कांद्याचे भाव स्थिरच, आता पुन्हा आवक घटली!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- गेल्या महिन्यात कांद्याच्या दरात सलग वाढ होत गेल्याने शेतकऱ्यांनी वखारीत साठवलेला कांदा बाहेर काढला. त्याचवेळी कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने केंद्र सरकारने कांद्याची आयात केली. त्यामुळे स्थानिक कांद्याचे दर सलग घसरत गेले. पारनेर येथील बाजार समितीत काल झालेल्या लिलावात कांद्याचे भाव स्थिरच होते.

आवक मात्र मोठया प्रमाणात घटली. अवघ्या ३ हजार १५ गोण्यांचीच आवक झाली. दरम्यान बिहार राज्यातील निवडणूका व परदेशातून आयात केलेल्या कांद्यामुळे भावात वाढ होत नसल्याचे, पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कांदा प्रश्न चर्चेत आल्याने केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे स्थानिक कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे. मागील काही दिवसांत केंद्र सरकारने कांद्याची आयात केल्याने वाढलेले दर सलग खाली आले. कांद्याची यंदा नासाडी झाली असली तरीही आजही अनेक शेतकऱ्यांकडे कांदा साठवलेला आहे.

सध्या बाजारभावातील चढ-उतार, बाजारातील आवक यानुसार कांद्याचे दर सलग कोसळत असल्याचे व्यापारी सांगतात. पण पारनेर येथील बाजार समितीत काल झालेल्या लिलावात कांद्याचे भाव स्थिरच होते. आवक मात्र मोठया प्रमाणात घटली असल्याचे दिसले.

काल पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. बाजार समितीच्या आवारात काल झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला ३५००-४४००, दोन नंबरला २५००-३४००, तीन नंबरला १५००-२४०० तर चार नंबरला ५००-१४०० असा बाजार भाव मिळाला. जिल्ह्यातील काही ठराविक शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. आता कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने ज्यांच्याकडे कांदा आहे, त्यांना आनंद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!