Share

मर्यादा ५० नाही ५०० करा; मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट आणि केटरर्स असोसिएशनचे आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – कोरोनामूळे करण्यात आलेला लॉकडाऊन मुळे देशांमध्ये सर्वच क्षेत्रांवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यावसायिकांना मोठ्या अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मक व राजकीय कार्यक्रमांना स्थिगिती देण्यात आली आहे. त्यामुळे टेन्ट, मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, डी. जे, साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन अडचणीत सापडले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील असोसिएशनच्या माध्यमातून अनलॉक प्रक्रियेमध्ये हॉल, मंडप उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी विविध निवेदने सुध्दा सरकारला देण्यात आली. मात्र, या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे राज्यभरातील मंडप, लाइट, साउंड इव्हेंट आणि केटरर्स चालक-मालक आज धरणे आंदोलनाला बसले आहेत. यामध्ये नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, जालना, सांगली आदी ठिकाणी लॉकडाऊनमुळे घाईला आलेल्या मंडप, डेकोरेशन व्यवसाय धारकांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात ५०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी द्यावी, अशी मागणी करत मोर्चे काढत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

यामध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय, हॉलच्या क्षमतेपेक्षा पन्नास टक्के आसन क्षमतेला परवानगी देण्यात यावी,
व्यवसाय संदर्भातील संबंधित 18 टक्के जीएसटीवरून पाच टक्क्यांवर करावा, भाड्याचे गोदाम असणाऱ्यांचे भाडे माफ करावे, कर्जदारांचे व्याज माफ करावे, ईएमआय स्थिती सामान्य होईपर्यंत स्थगित करावे, सर्व मंडप व्यवसाय धारकास उद्योगाचा दर्जा दिला जावा, व्यवसायाच्या संबंधित सर्व व्यवसाय धारकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडीची तरतूद करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!