🕒 1 min read
मुंबई: आता यापुढे घरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात यासंबंधी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने केराची टोपली दाखवली आहे.त्यापैकी हा अजून एक निर्णय आहे.
फडणवीस सरकारने घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन टाऊन प्लानिंगकडे (जिल्हा स्तरावर) दिले होते. त्यामुळे ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. अनेक लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाला विरोध केला होता.
महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेऊन फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्द केला. आता घर बांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात केली.
दरम्यान, परराज्यातील घुसखोरी करणाऱ्या मच्छिमारी बोटींवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत घुसणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाईसाठी वेगळा कायदा केला जाणार आहे. त्यासाठी मत्स्यविभागाचे मंत्री अस्लम शेख यांची येत्या १५ दिवसात बैठक होणार असून त्यांनंतर या संदर्भातील निर्णय घेतले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महाविकासआघाडी सरकारने शरद पोंक्षे यांना विधान परिषदेत पाठवू नये- सचिन खरात
- मोबाइलला नेटवर्क नाही म्हणून त्यांनी गावच काढले विकायला !
- संज्याचा पुढचा चित्रपट ‘एक शिवसेना थी’
- शेतकरी कायद्यामागील मोदी सरकारचा हेतूच शंकास्पद : पाटील
- जाणून घ्या देशात कोरोना बाधितांच्या संख्येत खरच घट होत आहे का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

