Share

अहो,या केसरकरांची आणि अशोक चव्हाण यांची नाराजी फक्त पदरात काहीतरी पडून घेण्यासाठी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : अशोक चव्हाण असू दे किंवा दीपक केसरकर या दोघांचीही नाराजी ही फक्त काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर केसकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे दीपक केसरकर सत्ताकेंद्रापासून दूर फेकले गेले होते. दीपक केसरकर तेव्हापासून जवळपास राजकीय अज्ञातवासात गेले होते. मात्र, शनिवारी त्यांनी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली नाराजी बोलून दाखवली.

तर काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, या अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला, असे चव्हाण यांनी म्हटले होते.

या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी चांगलीच तिखट प्रतिक्रिया दिली आहे.तसेच सिंधुदुर्गातील शिवसेना नेते दीपक केसरकर यांची नाराजी त्यांचे पक्षप्रमुख दूर करतील, असेही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!