Share

संजय राऊत यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवला : अवधूत वाघ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे पुण्याला असल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवला, असा टोला भाजप मीडिया सेलचे नेते अवधूत वाघ यांनी लगावला.

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा मुंबई हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आता शरद पवार यांच्यामुळे तो पुणे झाला आहे, असं बोलून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला’ असे ट्वीट अवधूत वाघ यांनी केले आहे.

पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची खास आपल्या शैलीत दिलखुलास उत्तरे दिली.त्यावेळी राऊत म्हणाले की

‘एकेकाळ वर्षाभरापूर्वी पत्रकारांना रोज १० वाजता भेटायचो. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे आहे. हे सरकार होणारच होतं. हे सरकार होणार नाही, असं काही लोकांना वाटत होतं, पण ते कसं शक्य आहे? निवडणुकीआधी मला हे सरकार असंच येईल, असं वाटत होतं. सरकार पूर्ण ताकदीने चालेल’ असं संजय राऊत काल म्हणाले होते.

राऊत यांच्या याच वक्तव्यावर अवधूत वाघ यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!