🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दसरा मेळाव्यातील जोरदार भाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली होती. त्यामध्ये स्वबळावर सत्तेचा नारा देण्यात आला होता. विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकविण्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता पक्ष विस्तारासाठी हालचालीही सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या जिल्हानिहाय संपर्कमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे नगर व नाशिकची तर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे सोलापूर व सांगली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकविण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता पक्ष विस्तारासाठी हालचालीही सुरू झाल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण हे गेल्या ३० वर्षांपासून ऐकत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर शिवसेनेने जिल्हानिहाय संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.
इतर संपर्कमंत्री पुढीलप्रमाणे- नगर व नाशिक जिल्ह्यांची जबाबदारी नाशिकचे असलेले कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर नगरमधील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे सोलापूर व सांगलीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जालना, एकनाथ शिंदे – चंद्रपूर, गोंदिया, उदय सामंत -कोल्हापूर, सातारा, गुलाबराव पाटील- बुलढाणा, अमरावती, अनिल परब- पुणे, रायगड, संजय राठोड – नांदेड, भंडारा, नागपूर, अब्दुल सत्तार- नंदूरबार, वर्धा, शंभुराज देसाई – हिंगोली, परभणी, संदीपान भुमरे -बीड, लातूर अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सिंघम गर्ल अडकणार लवकरच लग्न बंधनात, पहा फटोज
- #पुलवामा हल्ल्याची दिली कबूली,पाकड्यांचा दहशतवादी चेहरा उघड
- १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे उघडा अन्यथा टाळे तोडू; भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा
- मुंबई : ९०० कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप;चौकशी करण्याची मागणी
- निष्टावंतांना डावलून कॉंग्रेसकडून ‘हे’ नाव निश्चित ; वाचा काय आहे प्रकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

