Share

विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता लवकरच महाविकासआघाडी सरकारकडून याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रितसर प्रस्ताव पाठवला जाणार आहे. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

गेल्या काही दिवसांपासून राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या जागा भरण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विधानपरिषदेवर स्वत:ची वर्णी लावण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाली होती. यापैकी काँग्रेस पक्षाकडून नामनिर्देशीत विधान परिषदेची उमेदवारी सचिन सावंत यांची निवड झाल्याची माहिती मिळत आहे.

विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. काँग्रेसकडून गीतकार आणि संगीतकार अनिरुद्ध वनकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.तसेच मुजफ्फर हुसैन, रजनी पाटील आणि सचिन सावंत ही नावं निश्चित झाली असल्याचं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!