Share

आता दिवाळीनंतर होणार इंदुरीकर महाराज खटल्याची पुढील सुनावणी!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता.

आता कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात दाखल खटल्याची सुनावणी काल पुन्हा लांबणीवर पडली. आता ही सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे. काल दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद तयार नव्हते.

इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त विधानाचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर झळकले होते. या विधानामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये १९ जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.

काल हे कामकाज होणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले होते. मात्र दोन्ही बांजूच्या वकिलांची यासाठी तयारी नव्हती. त्यामुळे काल कामकाज होऊ शकले नाही. मधल्या काळात न्यायालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर होणार आहे. त्यानंतर दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे सुनावणी आता थेट २५ नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती ॲड.रंजना गवांदे पगार यांनी दिली आहे.

काल कोर्टाचे कामकाज झाले नसले तरी कोर्टाबाहेर काही घडामोडी पहायला मिळाल्या. या प्रकरणातील सरकारी वकिलांच्या भावाविरुद्ध संगमनेरच्याच न्यायालयात एक खटला सुरू आहे. इंदुरीकरांची बाजू मांडणारे वकीलच सरकारी वकिलाच्या भावाचाही खटला चालवित असल्याचे उघड झाले.

न्यायिक तत्वानुसार असे चालत नाही. ही माहिती बाहेर कशी आली, प्रसारमाध्यमांपर्यंत कशी गेली, याबद्दल संबंधित वकील एकमेकांकडे संशयाने पहात होते. आता यासंबंधी वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होतो. स्थानिक पातळीवर वकील काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!