🕒 1 min read
पुणे : पक्षाने जर माझा राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांपैकी एका जागेसाठी विचार केला तर ‘ होय मी नक्कीच विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक आहे ‘ असे दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी ‘ महाराष्ट्र देशा ‘ सोबत बोलतांना केला.
पण शेवटी सर्वस्वी निर्णय हा पक्षाचाच असणार आहे मी पक्षाच्या आदेशाचा कधीच अव्हेर करणार नाही, असेही लवांडे पुढे म्हणाले आहेत.
दरम्यान , विकास लवांडे हे राष्ट्रवादी पक्षाची बाजू माध्यमांत मांडत असतात.अनेक टी.व्ही. चर्चांमध्ये देखील त्यांचा समावेश असतो.सध्याच्या कोविड – १९ प्रादुर्भावाच्या काळात लवांडे यांचे काम खूपच चांगले राहिले आहे.अनेक मोठ्या रुग्णालयाच्या बिलात अतिरिक्त शुल्क आकारणीच्या कारणावरून लवांडे यांनी खूपच आक्रमक भूमिका घेतली होती.
कॉंग्रेसतर्फे नसीम खान, सचिन सावंत, मोहन जोशी, ऊर्मिला मातोंडकर, सत्यजित तांबे, आशिष देशमुख, चारुलता टोकस, रजनी पाटील ही नावं चर्चेत आहेत. ऐनवेळी उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत आल्याने मात्र या वेळी तरी कॉंग्रेस सचिन सावंत यांच्या सारख्या तडफदार प्रवक्त्याला आणि मोहन जोशी यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्यांना संधी देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तर शिवसेनेतर्फे सुनील शिंदे,आदेश बांदेकर,सचिन अहिर,शिवाजीराव आढळराव-पाटील, वरुण सरदेसाई यांच्यासोबत राहुल कनाल हे युवा सेना पदाधिकाऱ्याचे नाव देखील चर्चेत आहे.तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे एकनाथ खडसे,शिवाजी गर्जे,आदिती नलावडे,सूरज चव्हाण,राजू शेट्टी,आनंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर उद्या ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे. देशात एकूण ७ राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे.
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.पण बऱ्याच वेळेस राजकीय पुनर्वसनासाठी या नियुक्त्यांचा वापर केला जातो.
महत्वाच्या बातम्या
- अनिल गोटे यांनी पाडले भाजपला खिंडार,धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
- जान सानू प्रकरण: चौफेर टीकेनंतर अखेर ‘कलर्स’ने मागितली महाराष्ट्राची माफी
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- जनतेचा सेवक असल्याने जागा हडप करणाऱ्यांना माफ करणार नाही- लहू कानडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

