Share

डॉक्टरांची मेहनत फळाला आली; कपिल देव यांना मिळाला डिस्चार्ज

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- भारताचे महान अष्ठपैलू क्रिकेटपटू आणि पहिल्या वनडे वर्ल्डकप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी ही माहिती सोशल मीडियावरून दिली.

दरम्यान,कपील देव यांना शुक्रवारी हृदय विकाराचा झटका बसल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लॅस्टी करण्यात आली होती. छातीत दुखू लागल्याने कपिल देव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. कपिल देव यांना बरे होण्यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात होत्या.

कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ५२४८ धावा आणि ४३४ बळींची नोंद आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कपिल यांनी ३७८३ धावा केल्या तसेच २५३ बळी घेतले. १९९४ मध्ये फरीदाबाद येथे वेस्ट इंडीज विरूद्ध त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!