🕒 1 min read
पाटणा- बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. सत्तेचे सिंहासन मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष चांगलाच जोर लावत आहेत.रोज नवे आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यावर धक्कादायक आरोप केले. लालूंनी तीन वर्षांपूर्वी आपल्याला जादूटोण्याच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, लालू यादव हे अंधश्रद्ध व्यक्ती असून त्यांनी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पांढरा कुर्ता घालण्याचं बंद केलं. तर शंकर चरण त्रिपाठी या मांत्रिकाला राजदचा राष्ट्रीय प्रवक्ता बनवलं. याच मांत्रकानं विंध्याचल धाममध्ये (मिर्झापूर) लालू प्रसाद यादव यांच्याकडून तांत्रिक पूजा करवून घेतली होती. तीन वर्षांपूर्वी मला मारण्यासाठी देखील त्यांनी तंत्र पूजा केली आहे.
मुझे मारने के लिए तीन साल पहले करायी गई थी तांत्रिक पूजा… pic.twitter.com/y5Dbg5IQKN
— Sushil Kumar Modi (मोदी का परिवार ) (@SushilModi) October 25, 2020
जनतेवर लालू प्रसाद यादव यांचा विश्वास नसल्यामुळे ते तंत्र-मंत्राच्या पूजाअर्चा करीत असतात. ते प्राण्यांचे बळी आणि आत्म्यांची प्रार्थना करीत असतात. एवढ करुनही ते तुरुंगातून सुटू शकले नाहीत किंवा आपली सत्ता टिकवू शकले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- प्रकाश आंबेडकरही घेणार ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचा मेळावा
- मिर्झापूर वेब सिरीज मुळे जिल्ह्याची बदनामी- अनुप्रिया पटेल
- ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा’ चित्रपटातून ‘बहिर्जी नाईकांच्या चरित्राला उजाळा
- भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावंच लागेल – मोहन भागवत
- ‘सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खरेदी करताना स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
