मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. त्यामुळे त्यांच्या एका एका मावळ्याच चरित्र आणि मोहिमा या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहेत. त्यामुळे आता सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा पडद्यावर अनुभवला जातो त्यावेळी प्रेक्षकांसाठी तो रोमांच उभे करणारा अनुभव असतो. जोवर आपला राजा सोबत आहे तोवर आपण मोठी मजल मारु हे प्रत्येक मावळ्यांनी मनावर बिंबवून घेतलं होतं.
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान अशा उद्धवलेल्या समस्यांचा मागोवा घेताना शूर मावळ्यांचा इतिहास उलगडत जातो आणि या दरम्यान इतिहास आपल्याला अशाच एका अज्ञात यशस्वी शिलेदाराचे नाव समोर आणतो. अर्थात या धाडसी शिलेदाराचे नाव बरेचजण ऐकून असतील, पण त्यांचे कर्तृत्व मात्र अजूनही इतिहासाच्या पानांमध्ये कैद आढळते. हा शूर मावळा म्हणजे निष्णात बहुरूपी आणि जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ‘बहिर्जी नाईक’. अशा या शूर, धाडसी, विश्वासू शिलेदाराची गाथा लवकरच ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे.
नेहमीच पडद्याआड असणाऱ्या, विविध वेषांतरे करून समोरच्याला पुरते अचंबित करून सोडणाऱ्या या बहुरुप्याची कला निर्माती सौ. मंदाकिनी किशोर काकडे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. लेखक किरण माने यांनी या चित्रपटाकरीता लेखनाची धुरा सांभाळली असून ‘काक माय एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन अंतर्गत निर्माती सौ. मंदाकिनी किशोर काकडे या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा देत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- प्रकाश आंबेडकरही घेणार ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचा मेळावा
- मिर्झापूर वेब सिरीज मुळे जिल्ह्याची बदनामी- अनुप्रिया पटेल
- देशातील कोणत्याही नागरिकाला सीएएचा धोका नाही- भागवत
- भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावंच लागेल – मोहन भागवत
- ‘सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खरेदी करताना स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

