लखनौ : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या वेब सिरीज, टीव्ही मालिकांत प्रमाणे उत्सुकता ताणून न धरणाऱ्या या वेब सिरीज सध्या आकर्षण ठरत आहेत. यामध्ये 23 ऑक्टोबर ला दुसरा सिजन आलेल्या मिर्झापूर या दोन भाऊ आणि एका गॅंगस्टर वर आधारित असलेली वेब सिरीज मे 2018 मध्ये यामध्ये लेडींग गॅंग्ज मध्ये असलेल्या वैर आणि कटकारस्थान आणि खून खराबा सिरीजच्या पहिल्या सीझन आणि दुसऱ्या सीझनला देखील तरुणाईने डोक्यावर घेतलं.
मात्र उत्तर प्रदेश मधील मिर्झापूर या जिल्ह्याचे नाव असलेल्या या वेब सिरीज मुळे जिल्ह्याची बदनामी होत असल्याचे खासदार अनुप्रिया पटेल यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ही वेब सिरीज बनणाऱ्या दिग्दर्शकाने निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अनुप्रिया पटेल यांनी यांनी मिर्झापूर सिरीज च्या कंटेंट वर आक्षेप घेतला आहे. पटेल यांनी ट्विट करत मिर्झापूर शहराला विनाकारण बदनाम करण्याचे काम सुरू आहे या भागाची खासदार या नात्याने वर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे पटेल यांनी म्हटलं.
मिर्झापूर शहराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात विकास होत आहे परंतु मिर्झापूर वेब सिरीज च्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्याचबरोबर जातीय असमानतेची भिंतही उभारली जात आहे. त्यामुळे या सिरीजची चौकशी करून त्यावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरक्षण मुद्यावर कंगनाचे मोठे विधान
- भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीचा कांग्रेसला मोठा दणका, ‘हा’ बडा नेता लावला गळाला !
- ‘वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न होतोय’
- फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत, त्यांना शुभेच्छा : एकनाथ खडसे
- राष्ट्रवादीने विश्वासात न घेतल्यास ‘या’ निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
