🕒 1 min read
मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना आयकर विभागाने पाटणामध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. यावेळी आयकर विभागाला या परिसरात लावलेल्या एका कारमध्ये 8 लाख रुपये सापडले आहेत. यानंतर आयकर विभागाने काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्ति सिंह गोहिल यांची चौकशी केली आहे.
Bihar: A team of Income Tax officials arrive at Congress' office in Patna to serve a notice to them after money was recovered from a vehicle parked outside their compound. One person detained outside the campus of the office, after Rs 8.5 Lakhs was recovered from him. pic.twitter.com/j3YqzTMBop
— ANI (@ANI) October 22, 2020
यादरम्यान काँग्रेस कार्यालयावर नोटीस लावण्यात आली आहे. सांगितले जात आहे की, हा छापा साधारण एक तास सुरू होता, यामध्ये लाखो रुपयांच्या देवाण-घेवाणीत अनेक नेत्यांची चौकशी करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर काँग्रेस पक्षाशी संबंधित काही मूळचे बिहारच्या असलेल्या स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या संशयास्पद देवाण-घेवाणबाबत त्यांची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान शक्ती सिंह गोहिल यांनी जप्त केलेली रक्कम कुणाची आहे, हे मला माहिती नाबी असे सांगितले. प्राप्तिकर विभागाच्या या छाप्याची कारवाई सुमारे एक तास चालली. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने एका व्यक्तीला पकडले आहे. त्याने ही रक्कम पाटणामधील कुणाला तरी देण्यात येणार होता, असे सांगितले.
कधी भाजपा च्या मुख्यालयावर धाड घातली अशीही बातमी येऊ दे! इन्कमटॅक्स सारख्या राष्ट्रीय संस्थांना भाजपाचा पत्ता ठाऊक नाही असे दिसते. हजारो कोटी तिथेच सापडतील! https://t.co/Y2lfrBSebu
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 23, 2020
दरम्यान, कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याच मुद्द्यावरून जोरदार टोला लगावला आहे. कधी भाजपा च्या मुख्यालयावर धाड घातली अशीही बातमी येऊ दे! इन्कमटॅक्स सारख्या राष्ट्रीय संस्थांना भाजपाचा पत्ता ठाऊक नाही असे दिसते. हजारो कोटी तिथेच सापडतील!असा दावा त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पाषाणकर समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बेपत्ता
- ‘खडसेंनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल’
- दमानिया यांच्या गंभीर आरोपांवर खडसे सोडणार आज मौन?
- ‘राष्ट्रवादी सर्व भ्रष्ट नेत्यासाठीचे माहेरघर, त्यामुळे खडसेंचा पक्ष प्रवेश आश्चर्यकारक नाही’
- बिहार विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 14 उमेदवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

