🕒 1 min read
प्रफुल्ल पाटील : हो नाही, हो नाही करत आज अखेर भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला राम – राम ठोकला.गणपतराव खडसे आणि गोदावरीताई खडसे या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या एकनाथराव खडसे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात कोठळी गावाच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच या पदापासून झाली.त्यानंतर खडसे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावले आणि पहिल्यांदा १९८९ साली एदलाबाद या विधानसभा मतदार संघातून जवळपास २,६७२ मतांचा लीड घेत ते विधानसभेत पोहोचले.
१९९५ ते १९९९ च्या काळात भाजपा-शिवसेना सरकार मध्ये खडसे पाटबंधारे व अर्थमंत्री होते.आणि २००९ मध्ये एकनाथ खडसेंची महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.त्यांची ही कारकीर्द प्रचंड गाजली.२०१४ मध्ये नरेंद्र मोदी लाटेवर भा.ज.प.सत्तेत आला त्यावेळी खडसे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते परंतु अचानक देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली.खडसेंना हा पहिला धक्का होता.
पण तरीही त्यांना पक्ष नेतृत्वाने चांगली खाती दिली खडसे हे त्यावेळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले.२०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे तब्बल १२ खात्यांचे मंत्री होते.पण अचानक खड्सेंचे दृष्ट चक्र सुरु झाले .२०१६ साली त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
त्यापाठोपाठ २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. २०१९ मध्ये आमदारकीसाठी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर हिला भाजपने उमेदवारी दिली. शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप, रोहिणी खडसे विरुद्ध अपक्ष फॉर्म भरला. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ने पाठिंबा दिला व ‘चंद्रकांत पाटील’ यांनी रोहिणी एकनाथ खडसे यांचा जवळपास १९८९ मतांनी पराभव केला.
या सगळ्या प्रकारावर एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जामनेरचे आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वर आरोप केले. गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच आपले तिकीट कापले गेल्याचा खळबळ जनक आरोप त्यांनी एका वृत्त-वाहिनिशी बोलतांना केला. आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला असाही आरोप त्यांनी केला. जनाधार असलेल्या नेत्यांना तिकीट नाकारले व दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीट दिले गेले त्यामुळेच २०१९ विधानसभेत अपयश आले असे ते म्हणाले. खडसे यांनी आरोप केला की कोर कमिटी च्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना आपल्या बद्दल नाराजी व्यक्त केली.मे २०२० साली एकनाथ खडसे विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी उत्सुक होते, त्यांना उमेदवारी देण्यात यावी म्हणून त्यांनी भाजपा कडे उमेदवारीची मागणी देखील केली होती परंतु त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. म्हणून त्यांनी अनेक वाहिन्यांवर चर्चे प्रसंगी नाराजी व्यक्त केली.आणि आज अखेर २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसेंनी भाजप सोडला.
पण त्याच बरोबर दुसऱ्या बाजूला नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना मात्र पक्षाकडून बळ देण्याचा प्रयत्न केला जातोय.आज इकडे खडसेंनी राजीनामा दिला तर तिकडे पंकजा मुंडे या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपच्या मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्यावर गेल्या आहेत. त्यामुळे एक बहुजन नेता आपल्या हातातून गेला असला तरी दुसरा आपल्या हातात ठेवायचा असा बहुदा भाजपचा प्लान असावा किंवा असं काहीतरी भाजपच्या विचारवंतांना वाटतंय असं मत काही राजकीय विचारवंत बोलून दाखवत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- नाथाभाऊंचे पक्ष सोडणं धक्कादायक आणि दुःखद – मुनगंटीवार
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- फक्त खडसेच नाही तर अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक ; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
- नाथाभाऊ जाऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले, ‘त्यांना शुभेच्छा’ : केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

