Share

आता पंकजाताईंनी शिवसेनेत यावं, शिवसेनेच्या बड्या नेत्याचे निमंत्रण !

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गेले अनेक महिने नाराज असलेले खडसे भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या मात्र त्यांनी अशा अनेक मुहूर्तांना हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर आज भाजपची ४० वर्षांची असलेली साथ सोडून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

तर एकनाथ खडसे यांच्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रण माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिले आहे. मी एक पक्षाचा सच्चा सैनिक म्हणून पंकजाताईंना विनंती करतो त्यांनी सेनेत यावं अस अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भाजप सोडत असल्याची घोषणा केली आहे. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती आहे. अस म्हणताच एकनाथ खडसे यांचा कंठ दाटून आला. तर एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला, पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला असा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

छळाला मर्यादा नव्हत्या पण मी सहन केले अस एकनाथ खडसे म्हणाले आहेत. तर भ्रष्टाचाराचा आरोप केला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन, तरीही माझा राजीनामा घेतला अशी खंत एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!