मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गेले अनेक महिने नाराज असलेले खडसे भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या मात्र त्यांनी अशा अनेक मुहूर्तांना हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर आज भाजपची ४० वर्षांची असलेली साथ सोडून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
दरम्यान, जंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सूचक वक्तव्य केलं आहे. ‘अनेकांना आता विश्वास बसू लागला आहे की भाजप राज्याचा, देशाचा विकास करू शकत नाही. अनेक माजी-आजी आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत. ते राष्ट्रवादी पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. योग्य वेळी नावे जाहीर केली जातील. त्यांचे पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात न होता दिवसाढवळ्या होतील.’ असा टोला त्यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
अनेकांना आता विश्वास बसू लागला आहे की भाजप राज्याचा, देशाचा विकास करू शकत नाही. अनेक माजी-आजी आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत. ते @NCPspeaks पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. योग्य वेळी नावे जाहीर केली जातील. त्यांचे पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात न होता दिवसाढवळ्या होतील. pic.twitter.com/0Vxwma3mES
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 21, 2020
फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे राजीनामा दिला – खडसे
‘पक्षाने मला अनेक मोठी पदं दिली. मात्र आता मला कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती पण माझ्याशी छळ केला गेला. मी सहन केले, भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन, तरीही माझा राजीनामा घेतला. आजही भाजपवर रोष नाही, फक्त देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या वागणुकीमुळे हा निर्णय’ घेतल्याचा गौप्यस्फोट करत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- नाथाभाऊंचे पक्ष सोडणं धक्कादायक आणि दुःखद – मुनगंटीवार
- ‘देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण इतकं खुनशी असेल याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती’
- फक्त खडसेच नाही तर अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक ; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
- नाथाभाऊ जाऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले, ‘त्यांना शुभेच्छा’ : केशव उपाध्ये

