Share

मुलाला पाहण्यासाठी राज ठाकरे पोहोचले थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे सोमवारी सकाळच्या सुमारास मनसे नेते अमित ठाकरे यांना वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कालआपल्या मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले चिरंजीव अमित ठाकरे यांची लिलावातीमध्ये जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी लिलावातीमध्ये जाऊन अमित ठाकरे यांची भेट घेणं हा ठाकरे कुटुंबियांसाठी अत्यंत भावुक क्षण होता.

अंगात ताप असल्यामुळं खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काळजीचं कुठलंही कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितले आहे.डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. परंतु, सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली. तसेच त्यांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्यामुळे काहीही घाबरण्याचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान,गेल्या दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत आहे. त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कोविड चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. याशिवाय, त्यांचा मलेरिया चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!