Share

कालच्या रोमांचक सामन्यानंतर रोहित ऐवजी पोलार्ड आला माध्यमांशी बोलायला, कारण…

Published On: 

🕒 1 min read

दुबई : कोरोनाच्या अडथळ्यानंतर जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी मनोरंजक असलेल्या आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं आहे. यंदाचा हा आयपीएलचा १३ वा हंगाम आहे. आयपीएलचं हे पर्व अर्ध्यात आलं असून अधिकच उत्सुकतेचं बनत चाललं आहे.

काल दोन्ही सामन्यात सुपर ओव्हरची भर पडल्यामुळे चाहत्यांचा वीकेंड मजेत गेला. मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात तर सुपर ओव्हरचा डबल धमाका अनुभवायला मिळाला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत १७६ रन्सची खेळी केली. तर पंजाबने देखील १७६ धावा करत हा सामना बरोबरीत रोखला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये पंजाबने पहिली फलंदाजी करून अवघे ५ धाव केल्या. बुमराहचा भेदक यॉर्करचा मारा पंजाबला रोखण्यात यशस्वी ठरला.

यापाठोपाठ मुंबईची लगाम देखील मोहंमद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत ५ धावांवरच रोखली. यानंतर पहिल्यांदाच दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात मात्र, पंजाबने विजय मिळवला आणि या चुरशीच्या सामन्याचा शेवट भारतीय वेळेनुसार रात्री १२ नंतरच संपला. मुंबई इंडियन्सच्या फॅन्स साठी या पराभवासोबतच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघाचे कप्तान समाज माध्यमांशी संवाद साधतात. यावेळी मात्र मुंबईचा कर्णधार अनुपस्थित होता. त्याच्याऐवजी पोलार्ड संवाद साधण्यासाठी आला. ‘रोहित शर्माला बरं वाटत नाहीये. त्यामुळेच मी आलो असून तो फायटर आहे’ असं पोलार्डने सांगितलं. त्यामुळे आता रोहितला लवकरच बरं वाटो अशी प्रार्थना प्रत्येक क्रिकेट चाहता करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!