🕒 1 min read
मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा, 25 हजार कोटींच्या कथित महाराष्ट्र राज्य सरकारी बँक घोटाळ्याप्रकरणी 69 जणांना क्लीन चीट मिळाली आहे.यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.
एक वर्षापूर्वी अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अजित पवार यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरवे न मिळाल्याने खटला चालू शकत नाही असं कोर्टात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे.
25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालिन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.
सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि कलम 467 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे या गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांची नावं होती.
महत्वाच्या बातम्या :-
- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
- ‘सेनेचे स्टार कॅम्पेनर्स बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार’
- शाहू महाराजांनी आरक्षण दिले, मग आता मराठा समाजाला आरक्षणामधून बाहेर का फेकले जात आहे?
- उद्धवा धुंद झाला तुझा दरबार ! मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी १३ ऑक्टोबरला राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण
- गुप्तेश्वर पांडेंचा झाला गेम : शुभचिंतकांना म्हणाले, ‘मला फोन करू नका,त्रस्त झालो आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
