Share

#हाथरस प्रकरणी अखेर योगी आदित्यनाथ यांनी सोडले मौन, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

लखनौ : हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता.उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर प्रशासनाच्या व्यवहारामुळे देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे.

पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला.

पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांना देखील धक्काबुक्की झाली.राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासह 123 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल व प्रियांका गांधी यांच्याविरोधात 48 पानी एफआयआऱ दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हाथरस जात असताना नियमांचं उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विरोधी पक्षांनी,नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील,असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकरणात अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे की, उत्तर प्रदेशातील आई-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला धक्का पोहचवणाऱ्यांचा संपूर्णत: नाश निश्चित आहे. या दोषींना अशाप्रकारे दंड मिळेल की भविष्यात ते उदाहरण म्हणून दाखवलं जाईल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे असं योगींनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!