Share

अहमदनगर महापालिकेत गुरुवारी स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक झाल्यानंतर आता स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी अखेर मुहूर्त सापडला असून, येत्या गुरूवारी (दि.१ ऑक्टोबर) रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वीही एकदा स्वीकृत नगरसेवकपद निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती.

मात्र गटनेत्यांनी सुचविलेल्या नावांचे अर्ज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बाद ठरविले होते. त्यामुळे आता पुन्हा सभा बोलविण्यात आली आहे. महापालिकेतील संख्याबळानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रत्येकी दोन आणि भाजपचा एक असे पाच सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त केले जाणार आहेत.

अहमदनगर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन दीड ते दोन वर्ष झाले आहेत. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असताना सहा महिन्यांपूर्वी स्वीकृत नगरसेवकांसाठी सभा बोलविण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्व.बाबासाहेब गाडळकर व माजी नगरसेवक विपुल शेटिया तर शिवसेनेने संग्राम शेळके व मदन आढाव यांच्या तर भाजपने रामदास आंधळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. छाननी केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाचही अर्ज नाकारले होते.

आता प्रत्येक पक्षाचे गटनेते आपल्या संख्याबळानुसार सदस्यांच्या नावांची शिफारस करतील. यात राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी दोन आणि भाजप एका सदस्याच्या नावाची शिफारस करू शकतात. गटनेत्याने बंद पाकीटात सदस्याचे नाव व त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व इतर कामकाजाची माहिती असणारे पुरावे सादर करावयाचे आहेत.

नगरसचिव कार्यालयात सादर झालेली ही बंद पाकीटे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे सुपूर्द केली जातील. शिफारसीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून आयुक्त सभेमध्ये या नावांची शिफारस महापौर यांच्याकडे करतील. महापौर ती नावे सभागृहात जाहीर करतील. अशी ही निवडीची साधारण पद्धत आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!