🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- श्रीरामपूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत.
तालुक्यात झालेल्या पावसामुळे छोट छोटी गाव, वाड्यावस्त्या जलमय झाल्या आहेत. या जोरदार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी चक्क शेतकऱ्यांच्या समवेत बैलगाडीतून प्रवास केला. व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
तालुक्यातील अनेक भागात काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतात पाणी साचले असून पिके सडून जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कपाशी, भुईमुग, कांद्याची रोपे, बाजरी यांसारखी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अति पावसाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश आमदार लहू कनडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
परतीच्या पावसाने तालुक्यातील जाफराबाद येथील साठवण तलाव यंदा पुर्ण क्षमतेने भरला आहे. तलावातील पाणीसाठ्यामुळे नायगावसह जाफराबाद शिवारातील खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान या भागाची पाहणी करण्यासाठी आ.कानडे श्रीरामपूर येथुन गोदावरी नदी परिसरात जाण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांना वैजापूर-श्रीरामपूर खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागला. रस्त्यावरील खड्डे चुकवत अखेर त्यांनी नायगाव शिवार गाठले. त्यानंतर अतिपावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आ.कानडे यांनी बैलगाडीतुन प्रवास केला.
महत्वाच्या बातम्या :-
- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९१ वा वाढदिवस!
- राज्यात लवकरच सत्तांतर होईल; भाजपच्या या माजी मंत्र्याचे भाकित!
- स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यामुळेच मी राज्याचा मंत्री झालो- शंकरराव गडाख
- भाजपने सत्तेचे गड जिंकले मात्र एनडीए मधील ‘दोन सिंह’ मात्र गमावले; शिवसेनेचा भाजपवर घणाघात
- राष्ट्रपतींनी केली कृषी विधेयकं मंजूर; दिल्लीत शेतकरी प्रचंड आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
