मुंबई : वाचाळ अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. कंगनाने आता मुंबई हायकोर्टात संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची विनंती केली, त्याला कोर्टाने परवानगी दिली आहे. कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामावर बीएमसीने हातोडा मारला म्हणून कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात तिने संजय राऊत यांच्या धमकीचा उल्लेख केला आहे त्यामुळे हायकोर्टाने संजय राऊत यांना या प्रकरणात प्रतिवादी बनवलं आहे.
याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाचा पुन्हा एकदा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. बाबरीपासून आजपर्यंत मी मागे हटलो नाही हा ४० वर्षाचा इतिहास आहे, कारण माझ्यामागे शिवसेना, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आणि ठाकरे कुटुंब कायम पाठिशी आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, अरे ला कारे करण्याची आमच्यात धमक आणि हिंमत आहे. अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे.
राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, बंगाल असे काही राज्य आहेत जी स्वत:च्या स्वाभिमानासाठी लढत असतात. मुंबई महाराष्ट्राची राजधानी तिला कोणी पाकिस्तान म्हणत असेल, ठाकरे परिवार जे महाराष्ट्राच्या मराठी माणसाची अस्मिता आहे, त्यांच्याबद्दल कोणी चुकीच विधाने करत असेल. तर शिवसेनेचा नेता, मराठी माणूस म्हणून माझं कर्तव्य आहे, या सगळ्या द्वेषप्रवृत्ती विरोधात उभं राहणं, ते कोणाला अपराध वाटत असेल तर तो वारंवार करायला तयार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्यावर शेकडो केसेस चालले आहे. १९९२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यावर राज्यात १५५ खटले दाखल झाले, बाळासाहेब ठाकरे माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले हे माझं भाग्य आहे, सामना अग्रलेख, हेडलाईन, माझी वक्तव्ये, भाषणे, बाळासाहेब स्वत: राज्यातील आणि देशातील अनेक कोर्टात हिंदुत्वासाठी आरोपी म्हणून उभे राहिले. त्यामुळे अशाप्रकारे कोणत्याही खटल्याची मी पर्वा करत नाही, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, अस्मितेसाठी त्याच्या बदनामीविरोधात लढलो त्यासाठी मला तुरुंगात टाकणार असेल तर माझी तयारी आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अन्यथा अध्यक्षासह ५२ जिल्हा परिषद सदस्य आमरण उपोषणास बसतील, काय आहे प्रकरण
- महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत नाही
- कोल्हापूरातील गोलमेज परिषदेत मराठा समाजाचे ‘हे’ महत्वाचे ठराव!
- पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनांना प्राधान्य द्यावे – छगन भुजबळ
- शेतकऱ्यांचा दिवाळी साजरा करण्याचा मानस होता पण होत्याचे असे नव्हते झाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
